Nalasopara School : शाळेत बांगलादेशचा झेंडा फडकवल्याने वाद; नालासोपाऱ्यातील इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरातील घटना
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nalasopara School) नालासोपाऱ्यातील शाळेत बांगलादेशचा झेंडा फडकवल्याने आता वाद निर्माण झाला आहे. नालासोपारा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात बांगलादेशचा झेंडा फडकवण्यात आल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बाब निदर्शनास येताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलिसांसह शाळेत दाखल झाले. त्यांनी तात्काळ तो झेंडा हटवून शाळा प्रशासनाला कडक इशारा दिला. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Summary
शाळेत बांगलादेशचा झेंडा फडकवल्याने वाद
नालासोपाऱ्यातील इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरातील घटना
शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी
