Nandgaon
Nandgaon

Nandgaon : शालेय पोषण आहार बनवताना कुकरचा स्फोट; 2 महिला जखमी

नांदगावच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार बनवताना कुकरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

Nandgaon : नांदगावच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार बनवताना कुकरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोन महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

पोषण आहार शिजवताना अचानकपणे कुकर फुटला आणि यात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला किरकोळ भाजल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापकांनी घटनास्थळी धाव घेतली. मनमाड शहरातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com