महाराष्ट्र
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरात कोरोनाचा शिरकाव
कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोना ची लागण झाली आहे. राऊत यांच्या आई त्यांची पत्नी मुलगी आणि पुतणीला कोरोना ची लागण झाली आहे . घरातील सदस्यांना सर्दी ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती त्यामुळे या सर्वांची टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. संजय राऊतांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे.