पुणे | सर्वसाधारण सभेत लाचलुचपत विभागाची कारवाई, स्थायी समितीचे चेअरमन ताब्यात

पुणे | सर्वसाधारण सभेत लाचलुचपत विभागाची कारवाई, स्थायी समितीचे चेअरमन ताब्यात

Published by :
Published on

पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पोलिसांनी छापा टाकला आहे. सर्व साधारण सभा सुरू असताना पोलिसांची छापा टाकत स्थायी समिती चेअरमनच्या स्विय्य सहाय्यकाला दोन लाख रुपयांची लाच घेताना पकडले आहे.

पिंपरी महानगरपालिकेत टेंडर पास करण्यासाठी नऊ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी मनपाच्या स्थायी समिती चेअरमन नितीन लांडगे याचा स्वीय सहाय्यकाला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलं आहे.

ज्ञानेश्वर पिंगळे असे लाच स्वीकाणाऱ्या स्वीय सहाय्यकाचे नाव आहे. स्थायी समितीचा चेअरमन नितीन लांडगे यांनाही लाच लुचपत विभागाच्या ताब्यात आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com