महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वुमन वॉरियर’ पुरस्कार

महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वुमन वॉरियर’ पुरस्कार

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना महामारीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावल्याबद्दल महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 'कोविड वुमन वॉरियर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


राष्ट्रीय महिला आयोगाच्या 29व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी येथील विज्ञान भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा तसेच आयोगाचे सदस्य उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या-ज्या महिलांनी विविध क्षेत्रात कर्तव्यपालन केले त्यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील चार महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे यांना यावेळी गौरविण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com