महाराष्ट्र
Hingoli : डॉक्टरकडून माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य
हिंगोलीच्या वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना हिंगोली शहरात उघडकीस आली आहे.
हिंगोली: हिंगोलीच्या वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना हिंगोली शहरात उघडकीस आली आहे. दोन गटात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आरोपीला खाजगी डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल करून बेशुद्ध करत गंभीर जखमी केले आहे.
पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होण्यासाठी आरोपीला डॉक्टरने मदत केल्याचे कृत्य पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी हिंगोली शहरातील चिरायू हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्रीनिवास कंदी यांच्या विरोधात सत्यम देशमुख नावाच्या तरुणाने गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हा डॉक्टर अशा प्रकारचे कृत्य करत असल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तविली आहे.