नाकाबंदीमुळे चोरटे गजाआड ; १४ दुचाक्या आणि ४ रिक्षा हस्तगत

नाकाबंदीमुळे चोरटे गजाआड ; १४ दुचाक्या आणि ४ रिक्षा हस्तगत

Published by :
Published on

अनलॉक काळात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊन दररोज ८ ते १० दुचाकी चोरीच्या घटना भिवंडी परिसरात घडत आहेत. यामुळे पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नाकेबंदी करून पोलीस गस्त सुरू करण्यात आली आहे.

अखेर पोलिसांच्या नाकेबंदीला यश येऊन दुचाकी चोरणाऱ्यांना शांतीनगर पोलिसांनी गजाआड केली आहे. या चोरट्यांकडून विविध कंपनीच्या तब्बल १४ दुचाक्या आणि ४ रिक्षा हस्तगत करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

मोहम्मद सरजील सिराज अहमद मोमीन (वय १९ रा. खान कंम्पाउन्ड, भिवंडी) फिरोज हबीब शेख उर्फ लाला (वय २५ रा. गैबीनगर, भिवंडी ) असे गजाआड केलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com