बहिणीला व्हॉट्सअ‍ॅपवर त्रास देणाऱ्या दोघांची हत्या; चार आरोपींना अटक...

बहिणीला व्हॉट्सअ‍ॅपवर त्रास देणाऱ्या दोघांची हत्या; चार आरोपींना अटक...

शहापूरमधील धक्कादायक घटना..
Published by  :
Team Lokshahi

अनिल घोडविंदे|शहापूर: बहिणीला व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा कॉल व मॅसेज करून त्रास देणाऱ्या दोघांची शिर्डीत हत्या करून त्यांचे मृतदेह कसारा घाटात दोन वेगवेळ्या ठिकाणी फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील चारही आरोपीना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला अटक करण्यात यश आले आहे.

मनोज शिवप्पा नाशी (वय २४) , कुणाल प्रकाश मुदलियार (वय २३), प्रशांत अंबादास खुलुले (वय २५), फिरोज दिलदार पठाण (वय १९) अशी आरोपींची नावे आहेत. हे चारही आरोपी शिर्डीमधील रामनगरमध्ये राहणारे आहेत. तर सुफीयान सिराबक्ष घोणे (वय ३३ रा. लोणी,) व साहिल पठाण (वय २१, रा.सोनगाव) अशी हत्या झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत.

माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात व्यक्तीचे मृतदेह मुंबई - नाशिक महामार्गालगत असलेल्या खड्यात फेकले असल्याची माहिती कसारा पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पहिला मृतदेह मुंबई-नाशिक महामार्गावर वाशाळा फाटा या ठिकाणी आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत असतानाच, दुसरा मृतदेह नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट मार्गालगतच्या झाडाझुडपात असल्याची माहिती मिळाली होती. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी पंचनामे केला. दोन्ही घटनेतील अज्ञात आरोपींविरोधात हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून पोलीस तपास सुरू केला होता. तपासाच्या दोन महिन्याअंती चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com