श्रावणी सोमवार | रहिमाबादच्या पुरातन महादेव मंदिरात गर्दी
सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील पुरातन महादेव मंदिरात श्रावणी सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुमारे 14 व्या शतका पूर्वी सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील पुरातन महादेवाचे नागेश्वर मंदिर बांधले असल्याचे जाणकार व्यक्ती सांगतात.
या मंदिरासाठी गर्द काळया रंगाचे पाषाणाची निवड करीत अत्यंत सुबक पणे उभारलेले आहे. या मंदिराच्या खांबांवर उभारलेले अतिशय सुंदर पद्धतीने बांधकाम असलेले सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर ब्रह्म, विष्णू, गणेश यांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याचं बरोबर इंद्र दरबारातील नृत्य करणाऱ्या नृत्यांगना चे नक्षी काम अत्यंत सुबक पद्धतीने करण्यात आले आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर अशी महादेवाची पिंड स्थापित करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. दिवस भर भाविकांची पूजा अर्चा अभिषेकची रेलचेल दिसून येते. नवसाला पावणारा महादेव अशी अख्ययिका परिसरात आहे.