Dadaji Bhuse|Lokshahi Marathi Sanwad 2025 : “राज्यातील शिक्षक आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून देणार इतकी रक्कम ” 'उत्तर महाराष्ट्र संवाद 2025' कार्यक्रमात दादा भुसेंकडून पूरस्थितीबाबत महत्त्वाची अपडेट

Dadaji Bhuse|Lokshahi Marathi Sanwad 2025 : “राज्यातील शिक्षक आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून देणार इतकी रक्कम ” 'उत्तर महाराष्ट्र संवाद 2025' कार्यक्रमात दादा भुसेंकडून पूरस्थितीबाबत महत्त्वाची अपडेट

"उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" कार्यक्रमात मंत्री दादा भुसे यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Published on

लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज "उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आणि दीपक बिल्डर अ‍ॅंड डेवलपर्स प्रस्तुत या कार्यक्रमाला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमिवर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थिती लावली आणि दादा भुसे यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

अतिदृष्टीमुळे राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरीसह सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालेला आहे. खूप मोठे शेतीचे नुकसान झालेले आहेत. त्यामुळे या सर्वांच्या पाठीमागे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे, आणि सरकार देखील यांच्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे.

राज्यामध्ये ज्या पद्धतीने पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार खासदार लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी हे पाहणी करत आहे. पूरग्रस्त निर्माण झालेल्या परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान महोदय यांनी केंद्राकडे जसे पंचनामे सादर केले जातील तशा पद्धतीने मदत करण्याचे आव्हान देखील दिलेले आहेत

राज्यातील शिक्षकांकडून आपत्तीग्रस्तांना मदत

मी सर्वत्र नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आहे, त्यामुळे जवळपास 100% जिल्ह्यातील शेतकऱ्यांच नुकसान झालेला आहे. मी शिक्षक मंत्री असून माझ्या शिक्षक बांधवांनी यांच्या अनेक संघटना आहेत यांचा मला आनंद आहे. राज्यांमध्ये होणाऱ्या बिकट परिस्थितीतला मदत करण्यासाठी माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांनी त्यांच्या दिवसाचा एक पगार, आपत्तीग्रस्तांना मदत रुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मला खूप आनंद आहे आणि मी विनंती आणि आव्हान करतो की, अशाच पद्धतीने प्रत्येक नागरिकाने मदतीचे हात पुढे करावे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com