Dahi Handi 2025 : ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम; राज्यभरात दहीहंडीचा उत्साह
(Dahi Handi 2025) राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे… गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत.
राज्यभरात विविध दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातील गोविंदांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात दहीहंडीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे.
राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून लाखो रुपयांची बक्षिसे आहेत. अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये आनंद असतो. मुंबईतील दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. दादरमधील 'आयडियल'ची दहीहंडी प्रसिद्ध आहे आणि ती मानाची समजली जाते. येथे महिला गोविंदा पथकेही दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज असतात