Dasra Melava | स्वत:ची काळजी घेत दसरा मेळाव्याला या; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Dasra Melava | स्वत:ची काळजी घेत दसरा मेळाव्याला या; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Published by :
Published on

बीड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज दुपारी हा मेळावा होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घेत या मेळाव्यास यावे असे आवाहन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

सावरगाव घाट येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या स्मारकासमोर दसरा मेळाव्याची ग्रामस्थांतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा होणाऱ्या मेळाव्यानिमित्त आवाहन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मागील दोन वर्षाच्या काळात मनामध्ये बरच काही साचलं आहे. ते तुमच्या समोर मोकळं करायचं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

परंपरेप्रमाणे खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड अशी रॅली होणार आहे. गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दर्शनानंतर प्रितम मुंडे सावरगाव घाटकडे मार्गस्थ होणार असून सिरसाळा, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी, नायगाव मयूर मार्गे रोहतवाडी, चुंबळीहुन सावरगाव घाटला पोहोचणार आहे. मेळाव्यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com