Dawood Ibrahim : दाऊदच्या रत्नागिरीच्या खेडमधील मालमत्तेचा लिलाव होणार

Dawood Ibrahim : दाऊदच्या रत्नागिरीच्या खेडमधील मालमत्तेचा लिलाव होणार

दाऊदच्या रत्नागिरीच्या खेडमधील मालमत्तेचा लिलाव होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दाऊदच्या रत्नागिरीच्या खेडमधील मालमत्तेचा लिलाव होणार आहे. शुक्रवारी मुंबईत चार जागांचा लिलाव होणार आहे. सेफमा कायद्याअंतर्गत या लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या ९ वर्षात जवळपास ११ दाऊदच्या मालमतांचा लिलाव पूर्ण झाला आहे.

रत्नागिरीच्या खेडमधील चार जमिनी दाऊदची आई अमिना बीच्या नावावर आहेत. त्याचा लिलाव आता होणार आहे.19 लाख इतकी या जागेची किंमत आहे. याच्याआधी रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता.

रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या चार जागांचा लिलाव होणार आहे.रत्नागिरीतील मुंबके येथील दाऊदच्या मालकीची जमीन आहे. हा जमिनीचा लिलाव 5 जानेवारी 2024ला करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com