काँग्रेस ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी दयानंद चोरघे
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी व 14 नव्या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे. ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी भाजपा प्रदेश सचिव पदाचा राजीनामा देत पक्षास सोडचिट्ठी देऊन काँग्रेस पक्षात घरवापसी करणारे दयानंद मोतीराम चोरघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी भाजपा प्रदेश सचिव पदाचा राजीनामा देत पक्षास सोडचिट्ठी देऊन काँग्रेस पक्षात घरवापसी करणारे दयानंद मोतीराम चोरघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दयानंद चोरघे यांच्यावर काँग्रेस श्रेष्ठींनी नव्याने जबाबदारी दिल्याने ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.शुक्रवारी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र स्वीकारून भिवंडी सरवली पाडा येथील कार्यालयात दयानंद चोरघे दाखल होताच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यासह भिवंडी शहापूर मुरबाड या ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा केला आहे.