Election
Election

Election : महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Election ) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच आता डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यातच आता महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात करण्यात येण्याची शक्यता आहे.

महापालिकांच्या मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ संपताना पाहायला मिळत असून केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 22 डिसेंबर होती मात्र आता ही मुदत 27 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास पाच दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.

Summery

  • महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ

  • २२ डिसेंबर ऐवजी २७ डिसेंबर पर्यत मुदतवाढ

  • महानगरपालिका निवडणुकांची घोषणा आता 15 डिसेंबरनंतरच होण्याची शक्यता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com