महाराष्ट्र
Deccan Queen Express | शनिवारपासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेस धावणार
कोरोना महामारीमुळे बंद असलेली पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आता येत्या शनिवारपासून धावणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार असून सर्वांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा ही सेवा बंद केली होती. आता प्रदीर्घ कालावधीनंतर शनिवारपासून पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सुरू होणार आहे. डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ही 25 जून रोजी मुंबईहून दुपारी 5 वाजून 10 मिनिटांनी निघेल. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पहिल्यांदाच विस्ताडोम कोच जोडला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणे थांबणार असून सर्वांना दिलासा मिळणार आहे.