Rohit Arya
Rohit Arya

Rohit Arya : रोहित आर्य प्रकरणावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पवई परिसरात एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पवई परिसरात एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं

  • रोहित आर्य प्रकरणावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

  • 'मुलांना ओलीस ठेवण्याची पद्धत चुकीची'

(Rohit Arya ) मुंबईतील पवई परिसरात एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं होतं. रोहित आर्या असे त्या व्यक्तीचं नाव होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तातडीने कारवाई करत काही तासांतच सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. त्याने सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. पोलीस स्टुडिओच्या बाथरूममधून आत शिरले. यावेळी रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत आरोपी जखमी झाला. आरोपीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यातच रोहित आर्यचा जुना फोटो व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर मंत्री असताना रोहित आर्यने केसरकरांच्या शासकीय निवासस्थानी धरणे आंदोलन केलं असल्याची माहिती मिळत आहे. यातच आता रोहित आर्यचा दीपक केसरकर यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून यावर प्रतिक्रिया येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले की, त्याने जी पद्धत स्विकारली मुलांना ओलीस ठेवण्याची ती चुकीची होती. म्हणजे कोणी त्यांच्याशी बोलायला गेले असते आणि त्यांनी मुलांना काहीतरी केलं असते तर आपण स्वत:ला माफ करु शकलो नसतो. 2 कोटी ही त्यांची थकबाकी नव्हती. त्यांचा हा गैरसमज होता. एखादी स्कीम राबवत असताना वेगवेगळे खर्च असतात. एखाद्या मोठ्या स्कीमचा छोटासा भाग असेल तर तो व्यवस्थित झाला की नाही हे पाहणं महत्त्वाचे आहे आणि त्याची बिलं जर पेंडिग असतील तर त्या बिलाची पूर्तता करावी लागते. ही त्या त्या व्यक्तीने पूर्तता करावी लागेल. तो काही मंत्री करु शकत नाही. असे दीपक केसरकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com