Prachar Daura
Prachar Daura

Prachar Daura : आज राज्यात सर्वत्र प्रचार सभांचा धडाका; राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार दौऱ्यावर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Prachar Sabha ) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. बैठका, प्रचार सर्व जोरात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यात सर्वत्र प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार दौऱ्यावर असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पालघर दौऱ्यावर असून पालघर जिल्ह्यातील 3 नगरपरिषद व 1 नगरपंचायत यांच्या निवडणुकीच्या प्रचार सभा घेणार आहेत.

यासोबतच परतूर येथे नगरपालिकेच्या प्रचारासाठी अजित पवार यांची सभा होणार आहेत, सकाळी 11 वाजता त्यांची परतूर येथे सभा होईल. जालना जिल्ह्यात भोकरदन, परतूर, अंबड या तिन्ही नगरपालिकेची निवडणूक होत असून, प्रचाराची रणधुमाळीला सुरुवात झाली आहेत.

Summery

  • आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेत

  • आज राज्यात सर्वत्र प्रचार सभांचा धडाका

  • राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार दौऱ्यावर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com