उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पुण्यातील पूरस्थितीचा आढावा; तातडीनं मदत पोहोचवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पुण्यातील पूरस्थितीचा आढावा; तातडीनं मदत पोहोचवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, तसेच ग्रामीण भागातील खडकवासला , भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

पुढच्या 24 तासांतही मुसळधार पावसाची नोंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुणे हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने अग्निशमन दल रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवारांनी फोनवरुन पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. तातडीनं मदत पोहोचवण्याच्या अजित पवारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून बचाव कार्यासाठी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com