उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील पावसाचा आढावा; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी केली चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील पावसाचा आढावा; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी केली चर्चा

राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सगळीकडे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुढच्या 24 तासांतही मुसळधार पावसाची नोंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतला असल्याची माहिती मिळत आहे. पूर सदृश्य भागातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली असून सर्व लोकप्रतिनिधींना परिसरातील नागरिकांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात एनडीआरएफच्या 2 टीम तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापनातील सर्वांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. कुठल्याही मदतीसाठी लगेच संपर्क साधा तसेच सर्व लोकप्रतिनिधींना परिसरातील नागरिकांना मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com