Marathwada : नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अजित पवारांचा माध्यमांशी संवाद म्हणाले की...
थोडक्यात
मराठवाड्यात अतिवृष्टीचे मोठे नुकसान.
अजित पवारांनी बीडमध्ये पाहणी केली.
सरकारकडून तातडीची मदत जाहीर.
सध्या राज्यात पावसाने थैमान घातलेले पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास जाणू काही पावसाने हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गावागावांमध्ये पावासाचे पाणी तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकऱ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी आता राज्यातून मदत केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच अनेक नेत्यांनी आपला एक दिवसांचा पगार देण्याचा विचार केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
अजित पवारांनी म्हणाले की, अनेक रस्ते व पूल वाहून गेले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकाणी एक ग्रॅमही कापूस निघणार नाही अशी अवस्था आहे. पंचनाम्यांना ही आता सुरुवात करण्यात आली आहे. सरकारकडून तातडीच्या मदतीअंतर्गत प्रभावित कुटुंबांना 5 हजार रुपये आणि 35 किलो तांदूळ दिले जात आहेत. त्यानंतर पंचनाम्यानुसार भरीव मदत केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या मदतीबाबत त्यांनी सांगितले की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येत आहेत आणि त्यांना नुकसानीची माहिती दिली जाईल. हिमाचल, पंजाब प्रमाणेच महाराष्ट्रालाही अधिक मदत लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.