Ozar Development
Ajit Pawar

Ajit Pawar: ओझरच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Ozar Development: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओझरच्या पाणी, कचरा आणि रस्ते समस्यांचे कायमस्वरूपी समाधान करून ‘मिनी भारत’ बनवण्यासाठी राष्ट्रवादी पॅनलला मत देण्याचे आवाहन केले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

ओझर शहरातील पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि रस्त्यांच्या अडचणी कायमस्वरूपी सोडवून ‘मिनी भारत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनल निवडून द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी ओझरमध्ये झालेल्या प्रचारसभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रज्ञाताई हेमराज जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत अजित पवार यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.​

Ozar Development
Thane To South Mumbai Travel: ठाणे–दक्षिण मुंबई प्रवास होणार केवळ 25–30 मिनिटांत, MMRDA ने 13.9 किमी फ्रीवेचे काम सुरू

प्रज्ञाताई हेमराज जाधव या सुशिक्षित, पदवीधर आणि कार्यक्षम उमेदवार असून त्यांना नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार म्हणून ओळखले जात आहे. बारामती आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या विकासकामांचा दाखला देत त्यांनी ओझरमध्येही त्याच गतीने विकास कार्ये करण्याची हमी दिली.​

Ozar Development
Kalyan-Dombivali: KDMC रुग्णालयातील बंद ICUच्या निषेधार्थ MNSकडून अनोखे आंदोलन

ओझरच्या वाढत्या लोकसंख्येचा उल्लेख करताना अजित पवार यांनी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, नदी सुधारणा या क्षेत्रांत ठोस कामे करण्यासाठी केंद्र, राज्य, जिल्हा नियोजन आणि CSR मार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. “स्वच्छ, सुंदर आणि सक्षम ओझर उभे करणे हे आमचे प्रामाणिक ध्येय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.​

यावेळी त्यांनी आमदार दिलीप बनकर यांच्या माध्यमातून ओझरला मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून देण्याचेही आश्वासन दिले. सभेस आमदार दिलीपराव बनकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, अर्जुन टिळे, रंजन ठाकरे, सागर कुंदे, डॉ. योगेश चौधरी, राजेंद्र शिंदे, हेमंत जाधव, धोंडीराम पगार, कैलास शिंदे, सर्व उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Summary
  • पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि रस्त्यांच्या अडचणींचे कायमस्वरूपी समाधान करण्याचे आश्वासन.

  • उमेदवार प्रज्ञाताई जाधव सुशिक्षित, कार्यक्षम आणि विकासाभिमुख असल्याचे वर्णन.

  • आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com