Maharera : महारेरा वसुली आदेशाचे पालन न करणाऱ्या विकासकाविरोधात मालमत्ता जप्ती, थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharera) महारेरा वसुली आदेशाचे पालन न करणाऱ्या विकासकांविरोधात आता मालमत्ता जप्ती, बँक खाती गोठवणे तसेच थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ‘महारेरा’ने यासंबंधीचे परिपत्रक १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले असून या वसुली आदेशाची अंमलबजावणी त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाते.
‘महारेरा’च्या नवीन परिपत्रकानुसार मालमत्ता जप्ती, लिलावासह तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद असणार आहे. या निर्णयामुळे घर खरेदीदारांना दिलासा मिळणार असून हा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. वसुलीचे आदेश दिल्यापासून ६० दिवसांत घराची रक्कम व्याजासह परत न केल्यास तक्रारदाराला ‘महारेरा’च्या संकेतस्थळावरून विकासकाने रक्कम परत न केल्याबद्दलची तक्रार किंवा अर्ज करावा लागेल.
विकासकाची मालमत्ता जप्त करून, त्यांचा लिलाव करून त्यातून येणारी निश्चित रक्कम संबंधित तक्रारदाराला देण्यात येते. मात्र ‘महारेरा’च्या नवीन परिपत्रकानुसार मालमत्ता जप्ती, लिलावासह तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद असणार आहे.
Summery
महारेरा वसुली आदेशाचे पालन न करणाऱ्या विकासकाविरोधात मालमत्ता जप्ती
बँक खाती गोठवणे यासह थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद
असा निर्णय घेणार महाराष्ट्र पहिलं राज्य
