“सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण…”; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना आज खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. “महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत. भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालीसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक” असं फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
तसेच, “इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?” असा सवाल देखील फडणवीसांनी ठाकरे सरकारला केला आहे.याचबरोबर, “सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे! निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?” अशा शब्दांमध्ये फडणवीसांना ठाकरे सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे.