CM Devendra Fadnavis
MAHARASHTRA MUNICIPAL ELECTION RESULTS: FADNAVIS CLAIMS MAHAYUTI SWEEP

CM Devendra Fadnavis: 'महाविकास आघाडीचा विचार केला तर...', नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

Municipal Elections: नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल लागले असून राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले. काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका लढल्या गेल्या तर काही ठिकाणी पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निकालामध्ये फक्त आणि फक्त महायुतीचाच बोलबाला बघायला मिळाला.

CM Devendra Fadnavis
Vladimir Putin: रशियाला मोठा धक्का! व्लादिमीर पुतिन यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीवर भीषण बॉम्बहल्ला, युद्ध भडकण्याची भीती

नुकताच देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाजपा हा नगरपरिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे म्हटले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीने चांगली कामगिरी या निवडणुकीत केली आहे. नागपूरमध्ये भाजपाने अभूतपूर्व कामगिरी केली. 75 टक्के नगरसेवक हे आपल्या महायुतीने निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचा विचार केला तर त्यांचे एकून 50 च्या आसपास नगराध्यक्ष निवडून आले.

CM Devendra Fadnavis
Indapur Election 2025: इंदापूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची राजकीय खेळी यशस्वी

शिवसेना एकनाथ शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर राज्यात राहिला. जोरदार कामगिरी शिवसेनेने केली. भरत गोगावले, शहाजी बापू पाटील आणि संतोष बांगर या शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक अडचणीनंतर आपले गड कायम राखले. विशेष म्हणजे नागपूरमध्ये मोठे यश भाजपाला मिळाले. भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार कामगिरी या निवडणुकीमध्ये केली.

CM Devendra Fadnavis
Wanted Movie: ‘वॉन्टेड’च्या कास्टिंगमध्ये मोठा ट्विस्ट, सलमान खानला आयेशाऐवजी हवी होती 'ही' हिरोईन

आपले 210 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यामुळे या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केला आहे, हे देखील याठिकाणी स्पष्ट होतंय. भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपला जास्त आहे. राज्यामध्ये भाजपाने एक रेकॉर्ड तयार केला आहे, ते म्हणजे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा.

मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवला. मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच 2017 च्या निवडणुकीमध्ये आपणच 1 नंबर पक्ष होतो. यावेळी जवळपास 3 हजारांच्या वर नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. सहा पक्ष आणि इतक्या आघाड्या त्यामध्ये अपक्ष उमेदवार त्यामध्येही भाजपाने ही कामगिरी केली आहे. इतके जास्त नगरसेवक कोणत्याच पक्षाचे यापूर्वी निवडून आले नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Summary
  • नगरपरिषद निवडणुकीत भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष

  • महायुतीने राज्यभरात प्रभावी कामगिरी केली

  • नागपूरमध्ये भाजपाचा विक्रमी विजय

  • महाविकास आघाडीला मोठा फटका, फडणवीसांचा दावा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com