ग्रीन हायड्रोजन धोरणाला बुस्टर! 64 हजार रोजगार निर्मिती होणार; फडणवीसांची माहिती

ग्रीन हायड्रोजन धोरणाला बुस्टर! 64 हजार रोजगार निर्मिती होणार; फडणवीसांची माहिती

देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात 2 लाख 76 हजार 300 कोटींचे करार करण्यात आले आहे. याबाबत फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात 2 लाख 76 हजार 300 कोटींचे करार करण्यात आले आहे. याबाबत फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे करार झाले. यात ग्रीन हायड्रोजन विषयात 2 लाख 70 हजार कोटी गुंतवणूक होणार आहे. यात एनटीपीसी सह 7 मोठ्या कंपन्यांचा समावेश असणार आहे. यातून 63 हजार 900 रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन क्षेत्रांत अग्रणी होणार आहे. आणखी एक करार म्हणजे आर्सेनल मित्तल सर्वात मोठ्या स्टील कंपनीसोबत करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होते. एक्सलर मित्तल निप्पॉन स्टील आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात 6 मिलियन टन ग्रीन पोलाद प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी करार केला आहे. यातून 40,000 कोटी रुपये गुंतवणूक येणार आहे. तर, 20 हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तिसरा कार्यक्रम 'मित्र'च्या वतीने कृषिमूल्य साखळी कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांसोबत कृषिमूल्य साखळी तयारी करायची कार्यक्रम सुरू होतोय. 20 साखळ्यांसाठी उद्योजकांसोबत बोलणी सुरू आहेत. शेतकऱ्यांना उत्तम मालाची निर्मिती ते मालाला भाव उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू केले आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com