Devendra Fadnavis : कार्यकर्त्यांची नाराजी अनेकवेळा असते, आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करु

Devendra Fadnavis : कार्यकर्त्यांची नाराजी अनेकवेळा असते, आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करु

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर नवी मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर नवी मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाईक साहेबांशी माझी चर्चा झाली आहे. संजीव नाईक यांच्यांशी चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांची नाराजगी अनेकवेळा असते.

आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करु. सर्व कार्यकर्ते नवी मुंबईमध्ये ठाण्याचे जे शिवसेनेचं उमेदवार आहेत त्यांचे काम करतील. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com