Devendra Fadnavis On Virodhak : "इतके गोंधळलेले विरोधक..."; निवडणुक आयोगावरील टीकेवरुन फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगावर थेट पक्षपातीपणाचा आरोप केला. याचपार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Prachi Nate

राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगावर थेट पक्षपातीपणाचा आरोप केला. मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (जयंत पाटील गट), काँग्रेस आणि (महाराष्ट्र नवनिर्माण सेने)चे नेते राज ठाकरे एकत्र आले होते. त्यांनी मतदार याद्यांतील विसंगती, मतदारांची हटवलेली नावे, एका घरात असलेले शेकडो मतदार, आणि भाजपशी संबंधित असलेल्या कंपन्यांना दिलेले कंत्राट यावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. याचपार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"इतके गोंधळलेले विरोधक कधी पाहिले नाही, विरोधकांना कायदा माहित आहे का? पराभव दिसत असल्याने फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. विरोधकांना काय मागणी करावी हेच कळालं नाही. विरोधकांना आमची सहकार्याची भूमिका.... व्होटर लिस्टमध्ये बदल करायचे असल्यास सहकार्य करू..." असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'मुंबई-सोलापूर विमानसेवेच लोकार्पण झाले आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि इतर नेते उपस्तितही उपस्थित होते. 'मुंबई-सोलापूर विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विमानाने सोलापूरला जाणार असल्याची माहिती समोर आली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com