Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' ठिकाणी घेणार सभा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Devendra Fadnavis) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भिंवडी ,उल्हासनगर , कल्याण डोंबवली, लातूर येथे सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. या सभेतून मुख्यमंत्री फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभांचा धडाका
दुपारी 1 वाजता : लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचारसभा
दुपारी 3.30 वाजता : भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक प्रचारसभा
सायं. 5 वाजता : उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक प्रचारसभा, सेंच्युरी
सायं. 6 वाजता : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक प्रचारसभा
Summary
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभांचा धडाका
भिंवडी ,उल्हासनगर, कल्याण- डोंबवली, लातूरमध्ये सभा
महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार
