देवेंद्र फडणवीस यांनी इंस्टाग्राम शेअर केला भन्नाट मीम, लोक म्हणतायत, तुम्ही पण का...
राज्यात कोरोना काळापासून पोलीस भरती झाली नव्हती. यामुळे पोलीस भरतीची तयारी करण्याऱ्या मुलांमध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र, आता नुकताच राज्यसरकारने पोलीस भरतीची घोषणा केली. त्यानुसार पोलीस भरतीसाठी अर्जची सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, प्रचंड काळानंतर सुरु झालेल्या भरतीत आता मुलांना अर्ज करण्यासाठी अडीचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी करण्याची मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेत १५ दिवसांची मुदत वाढवून दिली होती. त्यावरूनच आता देवेंद्र फडणवीस यांनी इंस्टाग्राम एक मीम शेअर केला आहे.
काय आहे त्या पोस्टमध्ये?
पोलीस भरती, सर्व्हर डाऊन? पेमेंट गेटवेत खोळंबा? नेटला प्रोब्लेम?
चिंताच नको भावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आनंददायी घोषणा ऐक!
पोलीस भरती अर्जाला १५ दिवसांची मुदतवाढ
तरुणांच्या अडचणी सोडवणारे आपले सरकार
अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. मात्र, यावर नागरिक अतिशय भन्नाट प्रतिक्रिया देत आहे.