Devendra Fadnavis : माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पाडली.
Published by :
Siddhi Naringrekar

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पाडली. यावेळी मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण याकरता नाही आहे मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतो आहे. माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा.

यासोबत ते पुढे म्हणाले की, जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच काम केलं नाही. अडीचवर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं कार्य करु शकले नाहीत. त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्यासारखे आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com