Dhananjay munde
Dhananjay munde

धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Published on

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धनंजय मुंडे यांना संध्याकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या कुटुंबीयांशी देखील त्यांनी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com