Rajashree Munde : धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rajashree Munde)आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडें यांच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सावता माळी मंदिरात नारळ फोडत त्यांनी प्रचारफेरीला सुरुवात केली.
आज राजश्री धनंजय मुंडे यांनी परळी मध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार फेरी काढली असून प्रचारफेरीदरम्यान राजश्री मुंडे यांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. त्यांचे महिलांकडून औक्षण देखील करण्यात आले.
यावेळी राजश्री मुंडे म्हणाल्या की, प्रचारफेऱ्या सुरू आहेत. खूप चांगला प्रतिसाद महायुतीच्या बाजूने लोकांनी दिला आहे. लोकांमधला उत्साह दिसत आहे. साहेबांच्या बाजूने वातावरण आहे. विकासावर मतदान होईल, जातीपातीवर मतदान होणार नाही. असा ठाम विश्वास मला आहे.
Summery
धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात
बीडच्या परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार प्रचार
राजश्री मुंडेंनी महायुतीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास
