Thackeray Brothers : ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा फार्म्यूला ठरल्याची चर्चा; कोणाला किती जागा?
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers ) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार आहे. काल संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली. दुपारी 12 वाजता ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची पत्रकार परिषदेत घोषणा होईल.मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा फार्म्यूला ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे. मनसे आणि ठाकरे गटाचा मुंबई महानगरपालिकेसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत असून त्यानुसार मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 140 ते 150 जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला 60 ते 70 जागा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार गटासाठी 20 ते 25 जागा सोडण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा फार्म्यूला ठरल्याची चर्चा
मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 140 ते 150 जागा ठाकरेंच्या सेनेला
मनसेच्या वाट्याला 60 ते 70 जागा येण्याची शक्यता
