Mahayuti Seat Allocation : महायुती जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; जागा वाटप पुढील दोन दिवसात ठरणार ?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahayuti Seat Allocation ) नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांनंतर राज्यात पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे पाहायला मिळत असून महायुतीचे जागा वाटप पुढील दोन दिवसात ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन दिवसात तिसरी बैठक होणार असून या बैठकीत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होणार आहे. तिढा असलेल्या जागेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
महायुती जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात
महायुतीची जागा वाटप पुढील दोन दिवसात ठरणार ?
दोन दिवसात तिसरी बैठक होणार
