Breaking News : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेत 194 वॉर्डवरून वाद? मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरींना दिले होते लढण्याचे आदेश, मात्र आता...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली.
यातच आता मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यात काही जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बैठका घेण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेत 194 वॉर्डवरून वाद निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.
मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांना 194 मधून लढण्यासाठी तयारीचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता या जागेवर ठाकरेंच्या सेनेने दावा केला असल्याची माहिती मिळत आहे. जागावाटपात योग्य तो न्याय मिळत नसल्याने मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा असून पालिका निवड प्रक्रियेतून मुंबई अध्यक्ष देशपांडे यांना वगळल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेत 194 वॉर्डवरून वाद
मनसेने संतोष धुरींना दिले होते लढण्याचे आदेश
मात्र आता या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
