दिव्यांगाना मोफत उपकरणे वाटप; आमदार पराग शहांचा उपक्रम

दिव्यांगाना मोफत उपकरणे वाटप; आमदार पराग शहांचा उपक्रम

Published by :

घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तींना मोफत उपकरणे वाटप करण्यात आली. यावेळी असंख्य दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) च्या एडीप (ADIP) योजने अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत उपकरणे व कृत्रिम अंग वाटपासाठी त्यांच्या उपयोगी येणारे उपकरणे व साधने देण्यात येते. या योजनेअंतर्गत आमदार पराग शाह यांनी टिळक रोडवरील पारसधाम या जैन मंदिरात 17 व 18 फेब्रुवारी रोजी चिकित्सा शिबिर भरवले होते.

या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकली, व्हील चेअर, अंध बांधवांसाठी अत्याधुनिक अशी स्मार्ट केन, मोबाईल, ऐकण्याची समस्या असलेल्या दिव्यांग बांधवांना श्रवण यंत्र, सेरीब्रल पल्सी ही समस्या असलेल्या लहान मुलांना सीपी चेअर, हात व पाय नसलेल्यांना कृत्रिम हात व पाय बसवण्यात आले. तसेच बहुसंख्य दिव्यांग बांधवांना कॅलिपर देण्यात आले. या शिबिराचा घाटकोपर मधील तसेच जवळील परिसरातील शेकडोंच्यावर नागरिकांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थितीत ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, आमदार पराग शाह, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, भाजपा जिल्हाध्यक्ष अशोक राय आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com