इनरव्हिल क्लबच्या वतीने पैठण येथे डॉक्टरांचा सन्मान

इनरव्हिल क्लबच्या वतीने पैठण येथे डॉक्टरांचा सन्मान

कोणत्याही साथीच्या आजारात डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस रुग्णांची काळजी घेतात.

सुरेश वायभट, पैठण | कोणत्याही साथीच्या आजारात डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस रुग्णांची काळजी घेतात. डॉक्टरांचे हे योगदान खरंच कौतुकास्पद आहे असे मत इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष वैशाली परदेशी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पैठण येथे इनरव्हील क्लबच्या वतीने डॉक्टरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत असताना त्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, डॉ. राम लोंढे, डॉ. शैलेश घोडके, डॉ.धनंजय अर्जुन, डॉ. पंडीत किल्लारीकर, डॉ. दिगंबर खणसे, डॉ. सुनंदा खणसे, डॉ. अनिल सासणे, डॉ. मनिषा सासणे, डॉ. उषा शिंदे, डॉ. दिपेश चेमटे, डॉ. शितल चेमटे, डॉ. प्रमु होरकटे, डॉ. पुजा होरकटे, डॉ. लक्ष्मीनारायण लोहिया, डॉ. वैशाली लोहिया, डॉ. श्रीपाद दवखणे, डॉ. दवखणे मॅडम, डॉ. कांतीलाल पहाडे, डॉ. गौतम पहाडे, डॉ. संदिप सोरमारे, डॉ. प्रितम भस्मे, डॉ. बंटी जैस्वाल, डॉ. मेघा दळवी, डॉ. सखु झारगड, डॉ. किर्ती लोंढे, डॉ. निता शिरवत, डॉ. अश्विनी गलांडे, डॉ. प्रिती गायकवाड यांच्यासह इनरव्हिल कल्बच्या सदस्य उपस्थित होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com