डोंबिवली एकाच वेळी तीन जैन मंदिरात चोरी; एकाला अटक

डोंबिवली एकाच वेळी तीन जैन मंदिरात चोरी; एकाला अटक

एकाच दिवशी तीन जैन मंदिरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना डोंबिवली येथील विविध परिसरात घडली आहे.

डोंबिवली : एकाच दिवशी तीन जैन मंदिरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना डोंबिवली येथील विविध परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. नरेश जैन असे आरोपीचे आहे.

डोंबिवली एकाच वेळी तीन जैन मंदिरात चोरी; एकाला अटक
धक्कादायक! दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या

माहितीनुसार, डोंबिवलीच्या टाटा पॉवर लाईन, मानपाडा रोड, रामनगर या परिसरातील जैन मंदिरात ही घटना घडली आहे. नरेश जैन याने पूजा करण्याच्या बहाण्याने मंदिरामध्ये प्रवेश केला, आणि या तिन्ही मंदिरातील चांदीचे कलश, चांदीची फुले, चांदीची आरतीची थाळी, चांदीचा नारळ आणि चांदीचा दिवा असे तब्बल सोळाशे ग्राम पेक्षा जास्त वजनाची चांदी आणि सोन्याच्या वस्तू चोरी करून तिथून पळ काढला.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच डोंबिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरु केला. आणि मुंबईच्या गिरगाव परिसरातून नरेशला अटक केली. नरेशवर मुंबईमध्ये विविध पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे ९ गुन्हे दाखल आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com