Ayush Komkar Mother
Ayush Komkar Mother

Ayush Komkar Mother : 'आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका', अन्यथा मी...'; आयुष कोमकरच्या आईचा इशारा

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ayush Komkar Mother) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अनेकजण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता बंडू आंदेकरची सून वनराज आंदेकरची बायको सोनाली आंदेकर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकरच्या टोळीने आयुष कोमकरची हत्या केली होती. याच पार्श्वभूमीवर आता 'आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, अन्यथा मी आत्मदहन करेन.' असा इशारा आयुष कोमकरच्या आईने दिला आहे.

Summary

  • 'आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका'

  • 'अन्यथा मी आत्मदहन करेल'

  • आयुष कोमकरच्या आईचा इशारा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com