Jalgaon
महाराष्ट्र
Jalgaon : जळगावच्या चाळीसगावजवळ 50 कोटींचं ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई
जळगावच्या चाळीसगावजवळ 50 कोटीचं ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Jalgaon : जळगावच्या चाळीसगावजवळ 50 कोटीचं ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महामार्ग पोलिसांनी बोढरे फाट्याजवळ पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. जवळपास 39 किलोंचं ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
तपासणीसाठी थांबवलेल्या ब्रेझा कारमधून 39 किलो अंँफेटामाईन हा अत्यंत घातक अमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत 40 ते 50 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. आरोपीला ताब्यात घेऊन वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.