अकोला येथे भर चौकात नशेमध्ये गुंडाचा धुमाकूळ

अकोला येथे भर चौकात नशेमध्ये गुंडाचा धुमाकूळ

इराणी झोपडपट्टीतील गुंडाने बस स्थानक चौकात गांधी जवाहर बागेपुढे नशेत धुमाकूळ घालून महिला व मुलींची छेड काढली.

अमोल नांदूरकर | अकोला : इराणी झोपडपट्टीतील गुंडाने बस स्थानक चौकात गांधी जवाहर बागेपुढे नशेत धुमाकूळ घालून महिला व मुलींची छेड काढली. अनेकांना त्याने मारहाण केली. या गुंडाला कोतवाली पोलिसांनी सायंकाळी बेड्या ठोकल्या आहेत.

अकोला येथे भर चौकात नशेमध्ये गुंडाचा धुमाकूळ
मराठा आणि कुणबीत फरक, जरांगेंनी...; नारायण राणेंचा सल्ला

अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाटमारी, घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. त्यातच आता गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे. भरदिवसा गांधी रोड, बस स्थानक चौकात गुंडांचा त्रास वाढला आहे. गुरुवारी तर एका गुंडाने चक्क नशेत महिला व मुलींची छेड काढली. त्यांच्यासोबत असलेल्यांना मारहाण केली. हा धुमाकूळ सुरू असताना चौकात एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता.

पोलिसांना फोनवरून याबाबत माहिती देण्यात आली असता अर्धा तासाने दोन कर्मचारी घटनास्थळावर आले. मात्र, तोपर्यंत गुंड पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून इराणी झोपडपट्टीत राहणाऱ्या शुभम दुबे नामक युवकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक सुनील वायंडे यांनी दिली.

चौकात धुमाकूळ, पोलिस गायब

बसस्थान चौक नेहमी गजबजलेला असतो. या चौकात गुरुवारी एक गुंड दुपारी धुमाकूळ घालून महिला, मुलींची छेड काढत असताना चौकात एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. एकीकडे पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची हमी घेतात. दुसरीकडे त्याच विभागातील कर्मचारी मात्र आपले कर्तव्य विसरत असल्याने नागरीकांमध्ये पोलिस विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी दिसून आली. पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक यांना अमोल नांदूरकर यांनी माहिती दिल्यावर ही तब्बल अर्धा तास उशिराने कारवाई झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com