सांगलीत दत्त इंडियाने केली एक रकमी एफआरपी जाहीर

सांगलीत दत्त इंडियाने केली एक रकमी एफआरपी जाहीर

Published by :

संजय देसाई, सांगली | कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर केली होती. त्यानंतर ऊसदराबाबत उत्सुकता वाढली असताना वसंतदादा कारखाना भाडेतत्वावर चालवणार्‍या दत्त इंडिया कंपनीने कोंडी फोडली आहे. एकरकमी एफआरपी 2821 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याचे स्वागत केले आहे.

     दत्त इंडिया कंपनीचा पाचवा गळीत हंगाम प्रारंभ आज गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, दत्त इंडियाचे संचालक चेतन धारु, संचालक आदी उपस्थित होते. यंदाच्या हंगामात साडे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट्ये आहे.ऊसाला एकरकमी 2821 रुपये एफआरपी दिली आहे. कामगारांना सव्वा दोन पगार इतका बोनस दिला आहे.तसेच वसंतदादाची थकीत रक्कम वर्ग केली जाईल.शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस गळीतास आणावा. बाहेरुन काटा करुन ऊस आणल्यास तो स्विकारला जाईल.

    कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एक रकमी एफआरपी जाहीर केली आहे.. मात्र सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना अद्याप जाहीर केली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले होते. आज दत्त इंडिया ने एक रकमी एफआरपी जाहीर केली आहे. त्याचे स्वागत करीत इतर कारखान्यांनी ही जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com