Earthquake
महाराष्ट्र
Earthquake : अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची नोंद
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
(Earthquake) अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची प्रशासनाने माहिती दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात हा भूकंपाचा धक्का जाणवला. मेळघाटमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.
धारणी तालुक्यातील काही गावांमध्ये बुधवारी रात्री 9.58 वाजता 3.8 रिश्टर स्केलचा सौम्य स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसला असून धारणी तालुक्यातील शिवझिरी हे भूकंपाचे केंद्र आहे.
यासोबतच सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू या गावांच्या परिसरात देखील सौम्य स्वरुपाचा भूकंप झाल्याची माहिती मिळत असून या भूकंपामुळे त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.