महाराष्ट्र
पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, डहाणू, तलासरी परिसर हादरला
पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे हादरे बसल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी डहाणू आणि तलासरी परिसरात एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे.
आज सकाळी डहाणू आणि तलासरी परिसरात 11 वाजून 55 मिनिटाला भूकंपाचा पहिला धक्का जाणवला आणि त्यानंतर पुन्हा चार मिनिटांनी म्हणजे 11 वाजून 59 मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. 3.7 अशी तीव्रता रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील घरांच्या भीतींना तडे गेले आहे. सुदैवाने अद्याप कुठेही जीवितहानीचे वृत्त नाही.