Earthquake
Earthquake

Earthquake : सातारा जिल्ह्यात सलग दोन दिवस जाणवले भूकंपाचे धक्के

भूकंपाच्या धक्क्याने सातारा हादरले
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • भूकंपाच्या धक्क्याने सातारा हादरले

  • सातारा जिल्ह्यात सलग दोन दिवस जाणवले भूकंपाचे धक्के

  • भूकंपाची तीव्रता 2.2 रिश्टर स्केल

(Earthquake) सातारा जिल्ह्यात सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के जाणवले. 4 वाजून सहा मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती मिळत असून रात्रीचा वेळेस भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

साताऱ्यापासून 49 किलोमीटरवर भूकंपचा केंद्रबिंदू असून कोयना धरण सुरक्षित असून धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रता 2.2 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे

पाऊस सुरु असल्याने दरड कोसळण्याची भीती डोंगराशेजारी असलेल्या गावांना कायम आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com