Rohit Pawar
महाराष्ट्र
Rohit Pawar : रोहित पवारांविरोधात ईडीची कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?
रोहित पवारांविरोधात ईडीने कारवाई केली आहे.
(Rohit Pawar ) रोहित पवारांविरोधात ईडीने कारवाई केली आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून हे आरोपपत्र मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2022 अंतर्गत मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याच्याआधी बारामती अॅग्रो कंपनीच्या 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर आता हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
जानेवारीमध्ये, ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या जागेसह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. आता रोहित पवारांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून हा रोहित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.