एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे  यांना ईडीचं पुन्हा समन्स ?

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीचं पुन्हा समन्स ?

Published by :
Published on

मंगेश जोशी | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीकडून पुन्हा समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे.

मंदाकिनी खडसे यांना भोसरी भूखंड प्रकरणात चौकशीसाठी उद्या 18 ऑगस्ट रोजी डीडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे. यापूर्वी मंदाताई खडसे यांना ई डी कडून समन्स बजावले असता त्यांनी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र अद्यापही मंदाकिनी खडसे या चौकशी साठी हजर ना झाल्याने ईडीने आज पुन्हा समन्स पाठवून उद्या बुधवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com