Eknath Khadse : "पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा निर्णय परिस्थितीनुसार"
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Khadse) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातच पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, "पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट एकत्र निवडणुका लढवत आहेत."
"परिस्थितीनुसार त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. पण तो पुढच्या कालखंडामध्ये, भविष्यामध्ये एकत्र येतील की नाही हे आज सांगता येणं कठीण आहे. परंतु राष्ट्रवादीचा डीएनए एक आहे. त्यामुळे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही." असे एकनाथ खडसे म्हणाले.
Summary
एकनाथ खडसेंनी दोन्ही राष्ट्रवादीवर प्रतिक्रिया दिलीये
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा निर्णय परिस्थितीनुसार
भविष्यात दोन्ही एकत्र येतील का? सांगता येणे कठीण
