Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज प्रचार सभांचा धडाका
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रचाराला जोरदार सुरूवात करण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. या सभांमधून एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळी 11 वाजता कात्रज रोड येथे प्रचार सभा
दुपारी 1 वाजता कसबा पेठमध्ये प्रचार सभा
दुपारी 3 वाजता पिंपरी- चिंचवडमध्ये प्रचार सभा
संध्याकाळी 6.30 वाजता कल्याणमध्ये सभा होणार
Summary
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज प्रचार सभांचा धडाका
सभेतून काय बोलणार याकडे लक्ष
